तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून गेलेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात झाला. या भीषण अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एकूण नऊ जण होते वाहनात
तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आंध्रप्रदेशातील माध्यमांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील नऊ जण तिरूपती येथील श्री बालाजीच्या दर्शनासाठी कारमधून गेले होते. बुधवारी, २५ जानेवारी रोजी तिरूपती येथे श्री बालाजीचे दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना अचानक कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. यात पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
(हेही वाचा धीरेंद्र शास्त्री महाराज यांना पोलिसांची क्लीनचीट; अंधश्रद्धा पसरवत नाही तर धर्मप्रसार करतात)