कोकणवासीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे येत्या ४-५ वर्षांत ४ जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी ४४ हजार कोटींच्या गुंतवणूक होणार आहे. त्यावर केंद्र सरकारच्या नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) आणि महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागासोबत मंगळवारी, ६ जून रोजी मुंबईत समंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या गुंतवणुकीतून ठाणे जिल्ह्यातील काळू, कोकणातील सावित्री नद्यांवर तसेच केंगाडी आणि जालोंद येथे ७,३५० मेगावॅट जलविद्युत पंप्ड स्टोरेज प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे राज्यात ४४ हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक येणार आहे. हे सर्व प्रकल्प ४ ते ५ वर्षांत पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे. ईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे प्रकल्प भागात ७ हजार थेट रोजगारांसह एकूण १२-१३ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी कोकण हा भाग सर्व गोष्टीने अधिक अनुकूल वाटला त्यामुळे आम्ही कोकणाला अधिक महत्व दिले.
– डॉ. उदय निरगुडकर, एनएचपीसीचे स्वतंत्र संचालक.
महाराष्ट्र शासनाने सौर, पवन आणि हायब्रीड यासारख्या अन्य नवीकरण ऊर्जास्त्रोतांसह ऊर्जा संचय प्रणाली (पंप्ड स्टोरेज प्रकल्प) उभारण्यासाठी एनएचपीसीला चार जागा दिल्या आहेत. त्यासाठी काळू आणि सावित्री नद्यांवर धरणे बांधण्यात येतील. कालांतराने केंगाडी आणि जलोंद येथेही प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल. एनएचपीसीचे स्वतंत्र संचालक डॉ. उदय निरगुडकर यांनी यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे महाराष्ट्रात एनएचपीसीची एवढी मोठी गुंतवणूक होत आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे.
(हेही वाचा Game Jihad : मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू मुलांचे होतेय धर्मांतर; आरोपी शाहनवाज कुटुंबासह फरार)
सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्यानंतर आता या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादनाचे काम महाराष्ट्र शासनाच्या मदतीने तसेच खासगी माध्यमातून केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्र शासन सहकार्य करेल याशिवाय एनएचपीसी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडे औपचारिक मंजुरीसाठी अर्ज करेल.
कोणते प्रकल्प किती मेगावॅटचे?
- सावित्री प्रकल्प – २,२५० मेगावॅट
- काळू प्रकल्प – १, १५० मेगावॅट
- कॅगाडी प्रकल्प – १,५५० मेगावॅट
- जालोंद – २,४०० मेगावॅट