छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी स्फोटकांसह ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल २२९ बटालियनने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. (Chhattisgarh)
( हेही वाचा : Veer Savarkar अवमान प्रकरणी राहुल गांधी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर)
यासंदर्भात विजापूर पोलिसांनी (Bijapur Police) सांगितले की, जिल्ह्यातील सीआरपीएफ आणि आवपल्ली पोलिस ठाण्याचे संयुक्त पथक शुक्रवारी मुरदांडा, तिम्मापूर, चिल्कापल्ली आणि बयागुडा या गावांकडे नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. यावेळी मुरदांडा आणि तिम्मापूर (Timmapur) रस्त्यावर रस्त्याच्या कडेला पोलिसांना पाहून तीन-चार जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षा दलांनी या चौघांना घेरले आणि मुरदांडा तिम्मापूरजवळ अटक केली. त्यांच्याकडून स्फोटकांसह नक्षलवादी साहित्य आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये कोसा मडावी, नेड्रा बेल्लम, सन्ना उईके आणि सुरखाम मरकाम यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून एक टिफिन बॉम्ब, कॉर्डेक्स वायर, बिअरच्या बाटल्यांमध्ये बनवलेले बॉम्ब, विजेच्या तारा, बॅटरी आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले. (Chhattisgarh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community