राज्यात मंगळवारी कोरोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाचे दोन, वसई विरारमध्ये दोन तर साता-यात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
( हेही वाचा : बोरीवली रेल्वे स्थानक ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडणारा पूलच वादात अडकला)
राज्यात बीए व्हेरिएंट आढळल्यानंतर मुंबईत क्वचित एखाद्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद व्हायची. मात्र रविवारी मुंबईत दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रायगडमध्ये एका कोरोना रुग्णाने जीव गमावला. मंगळवारी नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीत तसेच डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येत अंदाजे ८०० चा फरक आढळला. राज्यात २ हजार ९५६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असताना २ हजार १६५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. एका दिवसांत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ०.१ टक्क्यांनी कमी होऊन ९७.९० टक्क्यांवर नोंदवले गेले. राज्यात आता १८ हजार २६७ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची वाढती संख्या
- मुंबई – ११ हजार ८१३
- पुणे – १ हजार २४६
- ठाणे – ३ हजार ४०३
- रायगड – ६४२
- पालघर – ४८३
- नागपूर – २३४