चोरीच्या संशयावरून १७ वर्षांच्या मुलाला केले ठार!

पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चार जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा कसून शोध सुरू आहे.

चोरीच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना पवईतील जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोड येथे घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चार जणांना अटक करण्यात आली असून इतरांनाच कसून शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सुरक्षा रक्षक, सुपरवायझर आणि कंत्राटदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पवई पोलिसांनी चौघांना केली अटक!

अनिकेत रामा बनसोडे (१७) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो पवईतील मिलिंद नगर झोपडपट्टीत राहण्यास होता. पवई येथील जेव्हीएलआर या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. अनिकेत आणि त्याचे काही सहकारी बुधवारी मध्यरात्री त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी मेट्रोच्या बांधकाम साईडवर असणारे सुरक्षा रक्षक आणि कामगार यांना अनिकेत आणि त्याचे सहकारी संशयास्पद हालचाली करीत असल्याचे आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी आरडाओरड करताच त्याठिकाणी जमाव गोळा झाला. त्यापैकी काही जणांनी अनिकेतला ताब्यात घेऊन लोखंडी पाईप, रॉडने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा मोबाईलवर व्हिडीओदेखील बनवण्यात आला होता. या मारहाणीत अनिकेत हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून  तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मारहाण करणाऱ्यापैकी चौघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. उमेश रामचंद्र परब (३८), सुजतअली नौशादअली (२६), सचिन मांडवकर (३८) आणि संदीप उत्तम जाधव (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

(हेही वाचा : महाराष्ट्र पोलिसांची गुजरात विधानसभेत वाहवा! जितू पटेलांची केली सुटका! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here