मुंबईतील डोंगरी (Dongari) भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. गुरुवार, १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. ही इमारत यापूर्वीच असुरक्षित घोषित करण्यात आली आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येणार होती मात्र त्यापूर्वीच मध्यरात्रीनंतर त्याचा काही भाग कोसळला. यामुळे मात्र डोंगरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
(हेही वाचा – खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannun च्या बँक खात्याची माहिती भारताला देण्यास अमेरिकेचा नकार)
कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले होते. इमारत आधीच रिकामी असल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. खबरदारीचा म्हणून शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली. “नूर व्हिला नावाची ही इमारत आहे. त्यात आधीपासूनच खूप तडे गेले होते. इमारतीच्या बांधकामासाठी निधीची व्यवस्था केली जात होती. पण दुरुस्तीचे काम झाले नाही आणि आज ही इमारत कोसळली. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई महापालिका अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दल ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत,” अशी माहिती अमीन पटेल (Amin Patel) यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community