नागपूरकडे जाणाऱ्या चार गाड्या येत्या वीकेंडला रद्द

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमॉडलिंगची कामे केली जाणार आहेत. परिणामी भुसावळ विभागातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या ४ रेल्वे गाड्या येत्या शनिवारी व रविवारी (१३ व १४ ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या आहेत.

सेवाग्रामसह चार गाड्या शनिवार, रविवारी रद्द

त्यात इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे. रविवार व सोमवार दोन दिवस मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या (डाउन मार्ग) चार गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यात १२६२७ बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस १.१० तास, ११०५५ एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस १.१० मिनिटे, १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनटे, ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेस २० मिनिटे थांबवण्यात येईल.

( हेही वाचा : Rupee bank : रिझर्व्ह बॅंकेकडून पुण्यातील रुपी बॅंकेचा परवाना रद्द)

दरम्यान, अप मार्गावर आठ रेल्वेगाड्यांना थांबा दिला जाणार आहे. १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १४ ऑगस्टला अमरावती, तर १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टला मुंबई येथून सुटणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १३ला नागपूर, तर १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ला पुणे येथून सुटणार नाही. १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १४ व १५ रोजी भुसावळ, तर इगतपुरी-भुसावळ मेमू १५ व १६ आणि १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट, तर १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ ऑगस्टला रद्द केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here