चिपीच्या धावपट्टीवर कोल्हा… पुढे घडले असे काही की वाचून थक्क व्हाल

गेल्या काही महिन्यांपासून चिपी विमानतळ हे त्याच्या उद्घाटनावरुन चांगलेच चर्चेत होते. पण आता उद्घाटन झाल्यानंतरही हे विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रविवारी चिपी विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरत असताना, त्याचा मार्ग एका कोल्ह्याने रोखला आणि त्यामुळे विमान धावपट्टीवर उतरू शकले नाही. जवळजवळ दहा मिनीटे हा थरार चालू होता.

असा रंगला थरार

सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर एका विमानाला दहा मिनीटं हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. धावपट्टीवर उतरण्यासाठी सज्ज असलेल्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर एक कोल्हा असल्याचे दिसले. हे पाहताच पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा आकाशात उडवले. त्यानंतर संबंधित यंत्रणेला सूचना देऊन कोल्ह्याला धावपट्टीवरुन बाहेर काढण्यास सांगण्यात आले. कोल्ह्याला बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरले. घडलेल्या या घटनेमुळे सुरुवातीला प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली होती.

(हेही वाचाः मोबाईलमधील काँन्टॅक्ट्स डिलीट झाले तर कसे मिळवाल? वाचा)

कुठून आला कोल्हा?

चिपी विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला होता. विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंतींनी बंदिस्त केल्या आहेत. तरीही हा कोल्हा धावपट्टीवर कुठून आला, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याबाबतची पुढील चौकशी आता विमानतळ प्रशासन करत असून, पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार आहे.

(हेही वाचाः टी-20 विश्वचषकः पाकिस्तानी चाहत्यांना वाटते पराभवाची भीती! थेट कर्णधाराला दिली धमकी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here