Foxconn in India : फॉक्सकॉन कंपनीची बंगळुरूतील ३०० एकर जागा कशी आकाराला येतेय?

फॉक्सकॉनचा बहुचर्चित कारखाना बंगळुरूत उभा राहत आहे आणि येत्या दहा वर्षांत इथून १ लाखांच्या वर रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. 

141
Foxconn in India : फॉक्सकॉन कंपनीची बंगळुरूतील ३०० एकर जागा कशी आकाराला येतेय?
Foxconn in India : फॉक्सकॉन कंपनीची बंगळुरूतील ३०० एकर जागा कशी आकाराला येतेय?
  • ऋजुता लुकतुके

फॉक्सकॉनचा बहुचर्चित कारखाना बंगळुरूत उभा राहत आहे आणि येत्या दहा वर्षांत इथून १ लाखांच्या वर रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. (Foxconn in India)

तैपेई मधील फॉक्सकॉन कंपनीने भारतात बंगळुरू इथं आपला कारखाना उभारण्याचं यावर्षी जाहीर केलं आणि त्यासाठी ८,५०० कोटींची गुंतवणूकही करण्याची तयारीही दाखवली. या गुंतवणुकीतून येत्या १० वर्षांत भारतात सुमारे १ लाख इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पावर सगळ्यांचंच लक्ष आहे. (Foxconn in India)

अलीकडे कर्नाटक सरकारने एक ट्विट करून फॉक्सकॉन कंपनीचा कारखाना उभारणीचं काम कुठवर आलं आहे याची एक झलक लोकांना दाखवली आहे. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ ही जागा आहे. मे २०२३ मध्ये कंपनीने ३०० कोटी रुपयांना ही जागा विकत घेतली. (Foxconn in India)

या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडून तिथं प्राथमिक बांधकामाला सुरुवात झाल्याचं आता दिसतंय. ‘आम्ही ठरलेली जमीन फॉक्सकॉन कंपनीला हस्तांतरित केली आहे आणि त्यांनी बांधकामाला सुरुवातही केलीय. बांधकाम वेगाने सुरू झालंय. हस्तांतरण विना अडथळा पार पडलं आहे आणि बांधकाम ठरल्याप्रमाणे विनाविलंब सुरू आहे,’ असं कर्नाटक सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस सेल्वाकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. (Foxconn in India)

फॉक्सकॉनचा हा प्रकल्प देवनाहल्ली तालुक्यातील दोड्डाहल्लापूर या औद्योगिक भागात उभा राहत आहे. तिथल्या इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट रिजन या सरकारने विकसित केलेल्या भागात ही जमीन आहे. मूळ नियोजनानुसार, एप्रिल २०२४ पासून या प्रकल्पात उत्पादन सुरू होणं अपेक्षित आहे. (Foxconn in India)

(हेही वाचा – Water Cutting In Mumbai : पूर्व उपनगरातील ‘या’ विभागांमध्ये सोमवारपासून कमी दाबाने होणार पाणी पुरवठा)

फॉक्सकॉन कंपनी तीन टप्प्यांमध्ये यात गुंतवणूक करणार आहे. पहिल्या टप्प्यात २०२३-२४ मध्ये ३,००० कोटी रुपये इतकी गुंतवणूक कंपनी करणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २०२५-२६ मध्ये ४,००० कोटी रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २०२७-२८ मध्ये १,००० कोटी रुपये इतकी गुंतवणूक फॉक्सकॉनकडून केली जाणार आहे. (Foxconn in India)

कंपनीने या प्रकल्पातून होणाऱ्या उत्पादनाची उद्दिष्टंही ठरवून दिली आहेत. पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रकल्पातून १,००,००० आयफोन तयार करायचे आहेत आणि हे प्रमाण २०२६ पर्यंत ५० लाख तर २०२७ पर्यंत १ कोटींवर न्यायचं आहे. (Foxconn in India)

फॉक्सकॉन कंपनी ॲपलला आयफोनचे सुटे भाग आणि त्यांची जोडणी करून संबंध आयफोन बनवून देणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. यावर्षी २० मार्चला कंपनीने कर्नाटक सरकारबरोबर एक समझोता करार करून आपला कारखाना बंगळुरूत सुरू करण्याचा इरादा स्पष्ट केला होता. (Foxconn in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.