वांद्रे (मुंबई) येथे भाजपाचे (BJP) अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पीए असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वकील आणि त्यांचे अशील यांना फोन करून काहीही कारणे पुढे करून ८ हजार, १० हजार अशी मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. हे प्रकार समोर आल्यानंतर आशिष शेलार यांचे पीए नवनाथ सातपुते यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नवनाथ सातपुते यांच्या तक्रारीनंतर वांद्रे (Bandra) पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. आमिन इरफान बेंद्रेकर (वय 26 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
(हेही वाचा – Western Railway: पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, ७३० लोकल रद्द)
वकिलांची फसवणूक
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 14 गुन्हे दाखल आहेत. सध्या वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक करून अधिक तपासाला सुरुवात केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी वकिलाला फोन करून त्यांच्या क्लायंटचा तुरुंगात असलेला नातेवाईक घसरून पडला आहे. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेलेले आहे. उपचारांसाठी आठ हजार रुपये लागत असल्याचे सांगत त्याने पैसे उकळले होते.
आजकाल सायबर क्राईमचे (Cyber crime) प्रमाण चांगलेच वाढले आहे. फोन कॉलद्वारे अनेकांची आर्थिक लूट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोपी अनोळखी नंबरवरून कॉल करून आम्ही पोलीस आहोत, सरकारी अधिकारी आहोत, असे भासवतात आणि भोळ्याभाबड्या नागरिकांची आर्थिक लूट करतात. अशा खोट्या फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. असे असूनही नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना घडतच आहेत. (Ashish Shelar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community