स्टेट बँकेनं (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केलं आहे. एसबीआय बँकेनं अनेक ग्राहकांना बरेच फेक मेसेज आल्याबद्दल सावध केलंय. बनावट रिवॉर्ड पॉईंट रिडेम्प्शन नोटिफिकेशनबाबत ग्राहकांना बँकेकडून सावध केलं जात आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना विविध बँकिंग चॅनेलद्वारे नियमित व्यवहारांसाठी कॉर्पोरेट लॉयल्टी प्रोग्रामसाठी एक महत्त्वाचे पॉईंट्स देते. प्रत्येक पॉईंट्सचे मूल्य २५ पैशांइतके आहे. बरेच युझर कित्येक महिने त्यांचे पॉईंट्स वापरत नाहीत. हॅकर्स आपल्या फायद्यासाठी या शिल्लक शिल्लक रकमेचा वापर करू शकतात.
(हेही वाचा Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्याच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू)
SBI ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पाठविलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही अॅप्लिकेशन किंवा फाइल डाउनलोड करू नका, असा सल्ला बँकेनं दिला आहे. स्पॅम आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांना उत्तर देत एसबीआयनं (SBI) आपल्या ग्राहकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी नवी पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. बनावट एपीके लिंकच्या माध्यमातून ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट वापरण्याचे आमिष दाखवलं जातं. ‘आम्ही कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवत नाही. ग्राहकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असं एसबीआयनं (SBI) म्हटलं आहे. एपीके इन्स्टॉल करू नका एपीके म्हणजे अँड्रॉइड अॅप्लिकेशन पॅकेज. एपीके ही एक अॅप्लिकेशन फाईल आहे जी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसह डिव्हाइसवर पाठविण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी वापरली जाते. एसबीआयच्या पोस्टनुसार, एसबीआय कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर लिंक किंवा अशाप्रकारच्या एपीके पाठवत नाही.
Join Our WhatsApp Community