सेवा विवेक सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण

109

सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा याहेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जात आहे. सेवा विवेकमार्फत बांबू हस्तकला स्वयंरोजगार निर्मितीसह बहुउद्देशाने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाच्या १५ व १६ तुकडीची सुरवात दहिसर व धुकटन दांडेकरपाडा येथे झाली.

New Project 2022 09 09T130428.725

३० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणाचा ७० आदिवासी महिला मोफत लाभ घेणार आहेत. प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व सेवा विवेकचे मार्गदर्शक रमेश पतंगे, धुकटन दांडेकरपाडाचे सरपंच प्रसाद भोईर, दहिसर येथील शिक्षक दशरथ केनी सर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर या मान्यवरांच्या हस्ते झाले. मान्यवरांनी महिलांना बांबू हस्तकलेचे महत्त्व सांगितले. त्यापासून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची माहिती देत त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

New Project 2022 09 09T130314.295

प्रशिक्षणानंतर महिलांचा पर्यावरणूपरक वस्तू बनवण्यात हातखंडा 

पालघर तालुक्यातील दहिसर देवलीपाडा आणि धुकटन दांडेकरपाडा येथील प्रशिक्षण वर्गाला कुशल बांबू हस्तकला शिकलेल्या सेवा विवेक संस्थेतील कुशल प्रशिक्षक महीलांद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेवाविवेकच्या ग्रामपातळीवर बांबू ग्रामोद्योग उत्पादनाच्या माध्यमातून पालघर जिल्हातील ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने बांबूपासून अनेक आकर्षक वस्तू तयार करण्यात येत आहेत. या उद्योगासाठी मागील काही वर्षांपासून पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.

New Project 2022 09 09T130220.559

( हेही वाचा: जे चुकीचे आहे त्यावर कारवाई होईल; याकुब मेमनच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया )

‘या’ वस्तू बनवल्या जातात

यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे कंदील, राखी, पेन होल्डर ,मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर,  जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार होत असून, उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांच्या रोजगारनिर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची संधी मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.