Free Blood Donation Camp: वीर सावरकरांच्या ५७व्या आत्मार्पण स्मृतिदिनानिमित्त मोफत रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

लोकमान्य रुग्णालय अँण्ड आयसीओ येथील डॉक्टर्स तपासणीकरिता आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

188
Free Blood Donation Camp: वीर सावरकरांच्या ५७व्या आत्मार्पण स्मृतिदिनानिमित्त मोफत रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. (Free Blood Donation Camp) दरवर्षी रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळते. रक्तदानाचे अनेक शारीरिक फायदेही आहेत. याचा फायदा रक्तदात्यांना व्हावा यासाठी वीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण स्मृतिवर्षाप्रीत्यर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हनुमान मंदिर, सावरकर नगर पोलीस चौकीसमोर, रोड नं. २२, ठाणे (प.) ४००६०६ येथे रविवारी, (१४ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या विनामूल्य शिबिराचा लाभ घेता येईल. या रक्तदान शिबिरात रक्तदाब (बीपी), मधुमेह आणि ईसीजी तपासणी विनामूल्य करता येईल तसेच ह्रदयरोग तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही मिळेल. लोकमान्य रुग्णालय अँण्ड आयसीओ येथील डॉक्टर्स तपासणीकरिता आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi: भोपाळच्या मशिदीत ‘मोदी है तो मुमकीन है’च्या घोषणा; भाजपसाठी बोहरा मुस्लिम समाज का महत्त्वाचा?)

अधिक माहितीकरिता – ९८६७९३७६३०, ९८३३५०९१४३ तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक २४४६५८७७ या भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.