Free & Cashless Facility For Road Accidents : रस्ते अपघातातील जखमींवर उपचारासाठी केंद्रसरकार मोफत आणि कॅशलेस योजना आणणार

रस्ते अपघातातील जखमी लोकांवर मोफत व कॅशलेस वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी येत्या ३-४ महिन्यात एक योजना आखण्यात येणार आहे. 

296
Free & Cashless Facility For Road Accidents : रस्ते अपघातातील जखमींवर उपचारासाठी केंद्रसरकार मोफत आणि कॅशलेस योजना आणणार
Free & Cashless Facility For Road Accidents : रस्ते अपघातातील जखमींवर उपचारासाठी केंद्रसरकार मोफत आणि कॅशलेस योजना आणणार
  • ऋजुता लुकतुके

रस्ते अपघातातील (Road Accidents) जखमी लोकांवर मोफत व कॅशलेस वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी येत्या ३-४ महिन्यात एक योजना आखण्यात येणार आहे. (Free & Cashless Facility For Road Accidents)

रस्ते अपघातात (Road Accidents) जखमी होणाऱ्या लोकांवर मोफत आणि कॅशलेस पद्धतीने वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी योजना तयार करण्याचा केंद्रसरकारचा (Central govt) प्रयत्न आहे आणि येत्या ३ ते ४ महिन्यांतच ही योजना कार्यान्वित होईल, असं हायवेज सचिव अनुराग जैन यांनी म्हटलं आहे. (Free & Cashless Facility For Road Accidents)

‘मोटर व्हेईकल ॲक्टमध्ये (Motor Vehicle Act) केलेल्या बदलांमुळे रस्ते अपघातात (Road Accidents) जखमी झालेल्यांवर मोफत आणि कॅशलेस उपचार करण्यासाठी योजना तयार करणं शक्य होणार आहे. सरकारचं त्यावर काम सुरू आहे. रस्ते बांधणी मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने ही योजना प्रत्यक्षात येणार आहे. काही राज्यांमध्ये ही योजना आधीपासूनच कार्यान्वित आहे,’ असं माहिती देताना जैन म्हणाले. (Free & Cashless Facility For Road Accidents)

(हेही वाचा – J&K Reorganisation Bill 2023 : गृहमंत्री अमित शाह लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक-2023 सादर करणार)

अलीकडे सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) रस्ते अपघातातील पीडितांना त्वरित आणि कॅशलेस उपचार मिळावेत असं मत एका निकालादरम्यान नोंदवलं होतं. अपघातानंतरचे ३-४ तास महत्त्वाचे असतात. या कालावधीला गोल्डन तास असं म्हणतात. या कालावधीत उपचार सुरू झालेल्या पीडितांना मोफत आणि कॅशलेस सुविधा मिळेल. (Free & Cashless Facility For Road Accidents)

भारतात रस्ते अपघातांचं (Road Accidents) प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे कॅशलेस योजनेबरोबरच रस्ते अपघात टाळण्याचे उपाय आणि अपघात झाल्यास करायचे तातडीचे उपचार याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्नही सरकारतर्फे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुरक्षित रस्ते प्रवासाविषयीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षा हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग असावा असं केंद्रसरकारला (Central govt) वाटतंय. (Free & Cashless Facility For Road Accidents)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.