पुणे महापालिकेच्या ३०० केंद्रांवरून ५ लाख राष्ट्रध्वजांचे मोफत वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महापालिकेकडून १५ क्षेत्रीय कार्यालयात सुमारे ३०० केंद्रांवरून पाच लाख राष्ट्रध्वज मोफत वाटले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम साजरा केला जात असून त्यानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

( हेही वाचा : 11th Admission : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक)

‘हर घर तिरंगा’

नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी पालिकेने पाच लाख राष्ट्रध्वज विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन केले जाणार आहे. हे झेंडे नागरिकांच्या घरोघरी जाऊन मोफत वाटावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सुमारे ३०० ठिकाणी वाटप केंद्र असणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here