1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

162

पंजाबमध्ये आगामी 1 जुलैपासून राज्यातील नागरिकांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. निवडणूक जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )

1 जुलैपासून राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंजाबमध्ये आप आदमी पक्षाला सरकार स्थापन करुन केवळ एकच महिना झाला आहे. या निमित्ताने पंजाब सरकारने 30 दिवसांच्या कामकाजाचं रिपोर्ट कार्ड जारी केले. या रिपोर्ट कार्डमध्ये 1 जुलैपासून राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आपचे प्रवक्ता नील गर्ग यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. प्रत्येक घरात 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच पंजाबातील बेरोजगारी कमी करणे आणि प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपयांची आर्थिक मदत करणे अशी आश्वासने आम आदमी पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्या आश्वासन पुर्तीसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. अशी माहिती गर्ग यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.