ऑनलाइन गेम्स मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. याचे ताजे उदाहरण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात पाहायला मिळाले. छतरपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. येथे एका माणसाने कोतवाली पोलीस ठाण्यात आपल्या घरातून चार तोळ्याचा सोन्याचा नेकलेस आणि काही रोख रक्कम गायब झाल्याची, तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलीस तपासात गुंतले. तपासात जे उघड झालं, त्याने सर्वांनाच धक्का बसला.
मुलगा दागिने आणि रोख रक्कम चोरत होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा ऑनलाइन अभ्यासासाठी वडिलांचा फोन वापरत होता. त्याचा आणखी एक मित्रही त्याच्यासोबत ऑनलाइन क्लासेस करायचा. एकत्र शिकत असताना, दोघांनाही फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन जडले. यानंतर दोघांनी नवा मोबाईल घेऊन, त्यात बॅलन्स भरण्याचा निर्णय घेतला. तक्रारदार यांच्या मुलाने प्रथम घरातून चार तोळे किमतीचे दागिने चोरले. त्यानंतर दोन मित्रांच्या मदतीने दोन नवीन मोबाईल घेतले. मोबाईलमधील सिम कार्ड व बॅलन्स आदी घेण्यासाठी त्याने घरातून 20 हजारांची चोरी केली.
( हेही वाचा: लोकल प्रवासी स्वतःहूनच झाले मास्क मुक्त आणि मग…)
असा सुगावा लागला
घरातून वारंवार पैसे गायब झाल्याने, हताश झालेल्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केले. यामध्ये त्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्राचे संभाषण रेकॉर्ड झाले. सध्या पोलिसांनी चोरीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. यासोबतच पोलिसांनी मुलांना फ्री फायर गेम्ससारख्या खेळांपासून दूर ठेवण्याचे पालकांना आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community