अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अगदी काही दिवसांवर आला आहे.येथील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. व्हीआयपी ते व्हीव्हीआयपी अशा सर्वच लोकांची सोय येथे करण्यात आली आहे.यादिवशी लाखो लोक येथे भेट देतील. व्हीआयपींसाठी सगळीच व्यवस्था चोख आहे. मात्र अनेक सर्वसामान्य लोकही या कार्यक्रमासाठी जाणार आहे. मात्र या ठिकाणी दर्शन झाल्यावर प्रसाद म्हणून भविकांना मोफत जेवणाची सुविधा येथे गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे यादीवशीही जेवणाची व्यवस्था असणार आहे. (Ayodhya Ram Mandir)
सध्या सर्वत्र अयोध्यात काय काय तयारी असणार आहे याचीच चर्चा सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासूनचे राम भक्तांचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे अनेक भक्त हा सोहळा अनुभवण्यासाठी जणार आहेत. तर प्रभू राम यांच दर्शन झाल्यावर अयोध्येत असलेल्या ‘राम रसोई’ (Ram Rasoi) नावाचे स्वयंपाकघर आहे.येथे येणाऱ्या भाविकांना मोफत जेवणाची सोय केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.तर २५०० ते ३००० लोक एकावेळी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात.Ayodhya Ram Mandir
(हेही वाचा : PM Modi Vadnagar: पीएम नरेंद्र मोदींच्या वडनगर गावात उत्खननातून सापडले पुरातन अवशेष, वाचा सविस्तर …)
काय आहे ही राम रसोई
अयोध्येतील अमावा मंदिरात पाटणाच्या महावीर मंदिर ट्रस्टद्वारे राम रसोई हे स्वयंपाकघर चालवल जात, ज्यामध्ये दरमहा सुमारे ९० हजार भाविकांना मोफत भोजन दिल जात. दररोज सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत ‘ राम रसोई’वर भाविकांना कूपन दिले जातात.या ठिकाणी विविध जिल्ह्यातून येणारे भाविक येथे मनसोक्त भोजन करतात. प्रभू राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कार्यालयातून भाविकांना जेवणासाठी कूपन दिले जातात.हे कूपन दाखवून भक्तांना जेवणाची थाळी मिळते.
या पदार्थाचा असतो समावेश
राम रसोई मध्ये ९ प्रकारचे पदार्थ भाविकांना दिले जातात. त्यात दोन प्रकारच्या भजे, कचोरी, चटणी, भात, डाळ, कोफ्ता, बटाट्याची भाजी, तूप, पापड या पदार्थांचा समावेश असतो. तसेच ज्यांना सांभार लागते त्यांच्यासाठी सांभारही मिळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community