गिरणी कामगारांकरता अडीच हजार घरांसाठी सोडत

मुंबईतील बंद पडलेल्या ५६ गिरणी कामगारांच्या वारसांना घरे देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. त्याकरता सरकार महामुंबई परिसरात जागा निश्चित करत आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून गिरणी कामगारांच्या घरासाठी जागा निवडली आहे. त्याप्रमाणे सरकार गिरणी कामगारांसाठी मे महिन्यात २ हजार ५२१ घरांसाठी लॉटरी काढणार आहे.

घरांचा ताबा म्हाडाकडे सुपूर्द 

गिरणी कामगारांनाही मोफत घरे देण्यासाठी राज्य सरकारने २००० साली योजना सुरु केली. त्यासाठी १ लाख ७५ हजार कामगारांनी अर्ज केला. मात्र जागेच्या अभावामुळे कामगारांना तितक्या संख्येने घरे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे. परंतु त्यानंतर गिरणी कामगार संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यासाठी म्हाडाला घरे बांधण्याची जबाबदारी दिली. एमएमआरडीएकडून ठाण्यातील रांजनोळी, रायगड जिल्ह्यातील रायचूर, पनवेलमधील कोल्हे भागात २ हजार ५२१ घरे बांधण्यात आली आहेत. एमएमआरडीएने या घरांचा ताबा म्हाडाला सुपूर्द केला आहे. त्यामुळे म्हाडाने २ हजार ५२१ घरांसाठी मे महिन्यात सोडत काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सोडत वांद्रे येथील मुख्यालयात काढली जाणार आहे. या घरांच्या सोडतीत करण्यात येणाऱ्या अर्जदारांची प्रारूप यादी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. या यादीविषयी काही आक्षेप, हरकती असल्यास २९ एप्रिलपर्यंत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा आनंदाची बातमी! एसी लोकलबरोबरच फर्स्ट क्लासही स्वस्त)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here