Free Laptop Scam Alert : शाळकरी मुलांसाठी मोफत लॅपटॉपचा संदेश खोटा असल्याचा पीआयपीचा निर्वाळा

Free Laptop Scam Alert : वॉट्सॲप संदेशांमधून घोटाळा घडवून आणला जात आहे

32
Free Laptop Scam Alert : शाळकरी मुलांसाठी मोफत लॅपटॉपचा संदेश खोटा असल्याचा पीआयपीचा निर्वाळा
Free Laptop Scam Alert : शाळकरी मुलांसाठी मोफत लॅपटॉपचा संदेश खोटा असल्याचा पीआयपीचा निर्वाळा
  • ऋजुता लुकतुके

देशभरात अनेकांना आपल्या वॉट्सॲपवर शाळकरी मुलांना मोफत लॅपटॉप वाटले जात असल्याचा एक संदेश आला आहे. मोफत लॅपटॉप वितरण योजना २०१५ असा मथळा या संदेशाला देण्यात आला आहे. ज्या मुलांना लॅपटॉप परवडत नसेल, त्यांच्यासाठी मोफत लॅपटॉपची सोय करून दिली जाणार असल्याचा दावा या संदेशात करण्यात आला आहे. शिवाय या योजनेत सहभागी होण्यासाठी लोकांकडून एक ऑनलाईन फॉर्मही भरून घेतला जात आहे. संदेशात एक लिंक असते. आणि ती उघडून हा फॉर्म लोकांनी भरायचा आहे. (Free Laptop Scam Alert)

हा संदेश फसवा असून एका घोटाळ्याचा भाग असल्याचं प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने स्पष्ट केलं आहे. संदेशात काय म्हटलंय ते आधी बघूया,  (Free Laptop Scam Alert)

(हेही वाचा- Rohit Sharma : रोहित शर्माला स्वत:च्या ढासळलेल्या फॉर्मविषयी काय वाटतं?)

शाळकरी मुलांसाठी मोफत लॅपटॉप योजना 

ही योजना आता सुरू असून ज्या शालेय मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे आर्थिक कारणांमुळे लॅपटॉप घेणं परवडत नसेल आणि शालेय शिक्षणासाठी लॅपटॉप आवश्यक असेल तर अशा मुलांसाठी ही योजना आहे.

२०२४ मध्ये ९,६०,००० मुलांना लॅपटॉपचं मोफत वितरण केलं जाणार आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

खालील लिंकवर नोंदणी आणि अर्ज करा, 

https://lc.ke/Students-FREE-LAPTOP

पीआयबी या सरकारी वेबसाईटने यावर फॅक्टचेक करून हा संदेश खोटा असल्याचं म्हटलं आहे. ‘हा लोकांना फसवण्याचा आणि अडकवण्याचा सापळा आहे. त्यामुळे अशा फसव्या योजनांना भुलून तुमची माहिती उघड करू नका,’ असं आवाहनच पीआयबीने केलं आहे. (Free Laptop Scam Alert)

शिवाय हा प्रकार म्हणजे एक घोटाळा असल्याचंच पीआयबीने स्पष्ट केलं आहे. या अर्जात लोकांनी भरलेल्या माहितीचा इतर आर्थिक घोटाळे करण्यासाठी इतर ठिकाणी वापर केला जातो, असं पीआयबीने म्हटलं आहे. खासकरून आर्थिक घोटाळ्यांसाठी ही माहिती वापरली जाते. (Free Laptop Scam Alert)

(हेही वाचा- Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी आणखी ३४ विशेष गाड्या धावणार; ‘असे’ असेल वेळापत्रक)

असे धोटाळे टाळण्यासाठी पीआयबीने काही सल्लेही दिले आहेत, 
  • संदेश कुठून आला त्या स्त्रोताची खातरजमा करून घ्या

  • अनोळखी ठिकाणाहून आलेल्या संदेशावर विश्वास ठेवू नका. लगेच सरकारी वेबसाईटवर जाऊन खात्री करून ध्या

  • वेबसाईटची विश्वासार्हता तपासा, पत्त्यात काही संशयास्पद आढळलं तर सतर्क व्हा

  • अशा लिंकमधून एखादा व्हायरल तुमच्या मोबाईल किंवा संगणकात घुसू शकतो. त्या द्वारे तुमची माहिती सायबर चोरांना मिळू शकते.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.