आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेमध्ये नव्याने ७५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा विस्तार होणार असून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना एलपीजी कनेक्शन (Free LPG Connection) देण्यासाठी अनुदान जारी करण्यास मान्यता दिली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंबंधीची माहिती देताना सांगितलं की, उज्ज्वला योजने अंतर्गत आतापर्यंत ८.६० कोटी एलपीजी सिलिंडर वितरित केले गेले आहेत. आता नवीन ७५ लाख कनेक्शन मोफत देण्यात येणार आहेत. गरजू आणि गरीब महिलांना याचा फायदा होईल, असं ठाकूर यांनी सांगितलं.अनुराग ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, तीन वर्षांमध्ये ७५ लाख एलपीजी कनेक्शन वितरित केले जाणार आहेत.
(हेही वाचा :Central Railway : दादर वरून सुटणाऱ्या २२ लोकल फेऱ्या होणार बंद , प्रवाशांना गाठावे लागणार परळ)
यासाठी तब्बल १ हजार ६५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यामुळे आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १० कोटी इतकी होईल.दरम्यान, मागच्याच महिन्यात केंद्र सरकारने ७५ लाख नवीन कनेक्शनसंदर्भात घोषणा केली होती. यासाठी लागणाऱ्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. हा निधी सार्वजनिक क्षेत्रातल्या पेट्रोलियम विपणन कंपन्यांकडे वर्ग केला जाईल.उज्ज्वला योजनेची सुरुवात मे २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. आता या योजनेचा विस्तार झालेला असून आणखी ७५ लाख कनेक्शन दिले जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community