मध्य प्रदेशात ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमान प्रवासाने तीर्थयात्रा

123

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी मतदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मार्च महिन्यापासून मोफत तीर्थयात्रेसाठी पाठवण्यात येणार आहे. यात मोफत विमान प्रवासाचाही समावेश आहे. दिल्ली सरकारने रेल्वेतून तीर्थयात्रा घडवल्यानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे.

२५ फेब्रुवारीला या यात्रेची सांगता होणार

मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेला मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा दर्शन या नावाने सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनाही विमानाने प्रवास करता येणार आहे. या योजनेंतर्गत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक सरकारी खर्चातून यादीतील कुठल्याही तीर्थक्षेत्राची यात्रा करु शकतात. भिंड शहराला महानगरपालिकेच्या अनुषंगाने अपग्रेड केले जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले. भिंड शहराला एक मेडिकल कॉलेजही देण्यात येणार आहे. सध्या येथे नगरपालिका कार्यरत आहे. विकास यात्रा सर्वच वार्डात जाऊन पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, विविध योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला या यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवून आणत आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात एकदाच या यात्रेचा लाभ घेता येणार आहे.

(हेही वाचा Turkey Earthquake: तुर्कीच्या संकटात भारताकडून मदतीचा हात; लवकरच NDRF पथकासह मदत सामग्री पाठवली जाणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.