मोफत रेशन योजना होणार बंद? गहू मिळणे बंद; त्याऐवजी काय मिळणार?

171

कोरोना काळात गरिबांसाठी दोन वेळच्या जेवणाची खात्री देणारी मोफत अन्नधान्य योजना केंद्र सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे. या योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार पडत असून, गंभीर आर्थिक परिस्थिती यापूर्वीच निर्माण झाली आहे. सध्या कोरोनाचा प्रभावही कमी झाला असल्याने, आता मोफत रेशनची गरज नसल्याने सप्टेंबरपर्यंत ही योजना बंद केली जाणार असल्याचे, मंत्रालयाने म्हटले आहे.

मार्च 2022 मध्ये केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य योजनेला आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. या योजनेवर आतापर्यंत 2 कोटी 60 लाख कोटी रुपये खर्च झाला असून, सप्टेंबर 2022 पर्यंत 80 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला.

का बसतोय सरकारला फटका?

मोफत अन्नधान्य योजना, खत अनुदानाचा वाढता बोजा, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोलवर अनुदान पुन्हा सुरु करणे, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, तसेच विविध उत्पादनावरील सीमा शुल्क कमी केल्याने सरकारसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, असे मंत्रालयाने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे.

( हेही वाचा मोठी बातमी: ३८ नाराज आमदारांनी मविआचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा )

गहूऐवजी काय मिळणार?

आतापर्यंत मोफत रेशन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जात होते. मात्र आता आलेल्या नव्या आदेशानुसार, गहूऐवजी तांदुळ दिले जाणार आहेत. कारण गव्हाची खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.