मोफत शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय ‘या’ जिल्ह्यात सुरू होणार

ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यांत मोफत शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरू केले जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वाडिया हॉस्पिटल आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयात लहान मुलांची मोफत टूडी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

( हेही वाचा : TET Scam : वेतन बंद केलेल्या शिक्षकांना अंतरिम दिलासा; औरंगाबाद खंडपीठाने दिले ‘हे’ निर्देश )

हे आम्हा सर्वांचे भाग्य – उदय सामंत 

मजगाव रोड येथील महिला रुग्णालयाच्या इमारतीमधील जागा या नव्या रुग्णालयासाठी वापरायला देण्यास रत्नागिरी नगरपालिका तयार आहे. जिल्ह्यातील द्रारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील माणूस यांच्यावर पैशाअभावी उपचार होत नाहीत, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. ती दूर करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळणार आहे असेही उदय सामंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here