Women’s Day 2023 : प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना PMPML मधून करता येणार मोफत प्रवास

पीएमपीएलच्या बसेसमधून प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. पीएमपीएलचा हा स्तुत्य उपक्रम येत्या ८ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू केला जाणार आहे.

( हेही वाचा : धक्कादायक: पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या पत्नींना पोलिसांची मारहाण)

महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात १९ मार्गांवर तब्बल २४ तेजस्विनी बसेस सध्या सुरू आहेत. स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा मार्गांवर तेजस्विनी बस सुरू आहेत.

दर महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत

८ मार्च २०२३ रोजी जगभरात मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर PMPML प्रशासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. पीएमपीएमएल प्रशासनाने पुढाकार घेऊन दर महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here