चार ते पाच लाख लोकसंख्या असलेल्या मालाड पूर्व भागात आता माफक दरात डायलिसिस सेवा देण्यात येणार आहे.दिंडोशीमधील त्रिवेणी नगरमधील दिव्या अपार्टमेंटमध्ये रुग्णांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने हेमोडायलेसीस केंद्र उभारले असून लाईफ लाईन मेडिकेअर हॉस्पिटल संचालित, “स्व. मॉं मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसिस केंद्रात आता आणखी १३ मशिन्स वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात आता एकूण २३ मशिन्स रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
( हेही वाचा : तेजस्विनी बेस्ट नक्की कोणासाठी? )
१३ डायलिसिस मशीन उपलब्ध
“लोकार्पण पर्यटन मंत्री, पर्यावरण मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर जिल्हा आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या दिंडोशी कूरार येथील “स्व. मॉं मीनाताई बाळासाहेब ठाकरे”, डायलिसिस केंद्रात १० डायलेसीस मशीन उपलब्ध करून महापालिकेच्या सवलतीच्या दरात डायलिसिस सेवा सुरू केली होती. तसेच पुढील कालावधीत आवश्यकतेनुसार मशीन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते. त्या अनुसार बुधवारी रोटरी क्लब यांचे मार्फत १३ डायलिसिस मशीन उपलब्ध करण्यात आल्या.
माफक दरात डायलिसिस सुविधा
या केंद्रात केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेला अंतर्गत मोफत डायलिसिस सुविधेस मंजुरी मिळाली. त्यानुसार केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना १ एप्रिल पासून मोफत डायलिसिस सुविधा मिळत आहे, तर उर्वरित नागरिकांना महानगर पालिकेच्या माफक दरात डायलिसिस सुविधा मिळत आहे. किडनी रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध देण्याचे आश्वासन खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आमदार, मुख्य प्रतोद सुनिल प्रभु यांनी २०१९ च्या निवडणुकी दरम्यान दिले होते. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, मुख्य प्रतोद आमदार सुनिल प्रभु, रोटरी क्लबच्या योगिता जैन, निर्मला झुनझुनवाला, शालिनी गुप्ता, संगीता राठोड, बबिता राठोड, अनिता पानसरी, नैना झुनझुनवाला, श्वेता कबरा व लाईफ लाईन मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ आंबेकर, उपविभाग प्रमुख माजी नगरसेवक गणपत वारीसे आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community