राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस! महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

132

राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून, त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५ वर्षांखालील लोकांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविशील्डची किंमत केंद्र सरकारसाठी दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये अशी राहणार आहे. कोवॅक्सिनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगी रुग्णालयांना, अशी जाहीर झाली आहे. असेही नवाब मलिक म्हणाले.

(हेही वाचाः सिरमनंतर भारत बायोटेकने जाहीर केल्या लसीच्या नव्या किंमती! किती रुपयात मिळणार कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड? वाचा…)

मुख्यमंत्र्यांचा होकार

मागच्या कॅबिनेटमध्ये या दरांबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी हे जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही, नवाब मलिक यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.