प्रवाशांना बस प्रवासाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये लवकरच मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. याला पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
( हेही वाचा : बेस्ट – लोकलवर झळकणार भारत- इस्त्राईलची मैत्री )
विविध उपाययोजना
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक राजेश रुपनवर आदी उपस्थित होते. येत्या काळात प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगाने पीएमपीकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याबाबत बैठकीत चर्चा झाली.
वाय-फाय सुविधा
आगामी काळात निविदा प्रक्रिया राबवून ‘वाय-फाय’ सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याबरोबर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या मासिक पाससह त्रैमासिक ते वार्षिक पासेस देण्यासाठी देखील संचालक मंडळाकडून मान्यता देण्यात आली.
Join Our WhatsApp Community