आता मध्य रेल्वेच्या प्रवासात करमणूक होणार Unlimited!

100

मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासात आजपासून मोफत करमणूक उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेच्या १६५ पैकी १० लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यासाठी लोकलमध्ये ‘कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय आणि मोबाईल अॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अॅप डाऊनलोड करून त्यातील करमणुकीचे विविध कार्यक्रम प्रवाशांना पाहता येतील. हे वायफाय प्रवाशांना अमर्याद वापरता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. यात आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने पाहण्यासाठी लोकलच्या डब्यात मोबाईलमधील इंटरनेटची गरज भासणार नाही.

( हेही वाचा : बापरे…फक्त ६० आंब्यांना मोजावे लागतायत ३१ हजार रुपये )

कंटेंट ऑन डिमांड

मध्य रेल्वेने ”कंटेंट ऑन डिमांड”चा प्रथमच अनुभव मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी घेतला, एप्रिल ते जानेवारी २०२१-२२ या कालावधीसाठी मध्य रेल्वेचा नॉन-फेअर महसूल २२.५७ कोटी आहे जो गेल्या वर्षीच्या तुलनेत २९५ टक्के अधिक आहे आणि सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. “कंटेंट ऑन डिमांड” या करारातून पाच वर्षांच्या कार्यकाळात रेल्वेला ८.१७ कोटी मिळणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता या कंटेंट ऑन डिमांड सेवेद्वारे इन्फोटेनमेंटचा अनुभव घेता येणार आहे. असे अनिल लाहोटी यांनी स्पष्ट केले.

डिजिटल सेवांचा आनंद

या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना शुगर बॉक्स ॲप डाउनलोड करावे लागेल. कंटेंटमध्ये प्रवेश (access) करण्यासाठी, इंटरनेटची आवश्यकता नाही. डेटाच्या वापरासाठी प्रवाशांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मोबाईल नेटवर्क अनियमित असताना देखील प्रवासी आता त्यांच्या संपूर्ण रेल्वे प्रवासात डिजिटल सेवांचा अखंडपणे आनंद घेऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.