श्रीराम मंदिर निर्माण कार्याचा अवमान! ‘त्या’ धर्मांध मुसलमानाला अटकपूर्व जामीन नाकारला!

विचारस्वातंत्र्य असणे म्हणजे अन्य धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा परवाना मिळाला असे होत नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले. 

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादास्पद जमीन श्रीराम मंदिराला देऊ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला, मात्र त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या समाजविरोधी संघटनेचा कार्यकर्ता महंमद नदीम या धर्मांध मुसलमान युवकाने अवमानकारक वक्त्यव्य केले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर त्या युवकाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिस त्याला आता केव्हाही अटक करतील.

काय म्हणाला होता महंमद नदीम?  

श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महंमद नदीम याने बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभे राहत आहे. बाबरी मशिदीची जागा वाचवण्यासाठी मुसलमानांची पुढे यायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते.

तुम्हाला विचारस्वातंत्र्य दिले आहे, हा मूलभूत अधिकार आहे, मात्र म्हणून अन्य धर्मीयांच्या भावना दुखावणे, त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणे याचा परवाना मिळाला, असे होत नाही.
– न्यायमूर्ती चंद्रा धारी सिंग, अलाहाबाद उच्च न्यायालय

असा झाला गुन्हा दाखल! 

तक्रारदार अनिल कुमार आणि अमित कुमार हे जेव्हा बहरौली गावात आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना नदीम हा अपप्रचार करत आहे. बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभे केले जात आहे, असे सांगत आहे, असे सांगितले. त्यामुळे अनिल आणि अमित यांनी नदीमच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम १५३ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला.

(हेही वाचा : सचिन वाझेला गुन्हे शाखेत घेण्यासाठी परमबीर सिंग आग्रही! नगराळे यांच्या अहवालात गौप्यस्फोट)

कनिष्ठ न्यायालयानेही फेटाळला जामीन! 

यानंतर नदीम याने अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज केला, मात्र २८ सप्टेंबर २०२० रोजी न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. आरोपीचे वक्तव्य हे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे, असा  निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. त्यानंतर नदीम याने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळून लावल्याने नदीमला हातात केंव्हाही अटक होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here