अदानींना मोठा फटका; फ्रान्सच्या कंपनीने प्रोजेक्ट थांबवला

161

हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. असे असूनही भारतीय शेअर बाजारात अदानींच्या शेअरला बुधवारचा दिवस चांगला गेला. मात्र तरी फ्रान्सच्या बड्या कंपनीने याच दिवशी मोठा झटका दिला आहे. तब्बल ५० अब्ज डॉलर्सचा प्रोजेक्ट या कंपनीने थांबविला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

अदानींच्या कंपन्यांमध्ये या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. अदानींसोबतच्या हायड्रोजन प्रकल्पातील भागीदारी फ्रान्सच्या टोटल एनर्जी कंपनीने स्थगित केली आहे. अदानी समूहासोबतची भागीदारी गेल्यावर्षी जूनमध्ये जाहीर करण्यात आली होती. परंतू त्या करारावर अद्याप स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या, असे फ्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिक पोयाने यांनी सांगितले. टोटल एनर्जीस अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मध्ये 25 टक्के इक्विटी घेणार होती. ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम विकसित करण्यासाठी 50 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह 2030 पर्यंत 10 लाख टन हरित ऊर्जा निर्माण करण्याचे अदानी समूहाचे उद्दिष्ट आहे. त्याला मोठा धक्का बसला आहे. आमच्यासाठी गोष्टी स्पष्ट होईपर्यंत हायड्रोजन प्रकल्प थांबविला जाईल, असे स्पष्टपणे पोयाने यांनी सांगितले आहे. अदानी ग्रुपमध्ये $3.1 बिलियनची गुंतवणूक असलेली टोटल एनर्जी ही हिंडनबर्ग रिपोर्टमुळे चिंतेत आहे.

(हेही वाचा २००४-२०१४ स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट दशक; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.