मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम मंगळवार, दिनांक २४ मे २०२२ ते शुक्रवार, दिनांक २७ मे २०२२ या कालावधीत हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पिसे पांजरापूर संकुल येथून होणा-या पाणीपुरवठ्यावर ४ दिवस परिणाम होणार होता. परंतु चार दिवसांचे काम तीन दिवसांमध्येच पूर्ण करण्यात आले असल्याने शुक्रवारी होणारी ५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ‘ए’, ‘बी’, ‘ई’, ‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’, ‘एल’, ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’, ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ विभागात काही परिसरांतील पाणीपुरवठा शुक्रवारी सुरळीत राहणार आहे.
( हेही वाचा : परिचारिकांच्या धुलाई भत्त्यावर केंद्राकडून सर्फ पावडर तर राज्याकडून माती – दरेकर)
पाणीकपात रद्द
मंगळवार, दिनांक २४ मे २०२२ ते शुक्रवार, दिनांक २७ मे २०२२ या कालावधीत दररोज सकाळी ११.०० वाजेपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४ तासांकरिता १) ‘एन व एस’ विभागातील पूर्वेकडील भाग, २) संपूर्ण ‘टी’, ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभाग, ३) ‘एल’ विभागातील पूर्वेकडील भाग, ४) ‘बी’, ‘ई’, ‘एफ उत्तर’, ‘एफ दक्षिण’ आणि ‘ए’ विभागाच्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती. मात्र, पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील १०० किलो व्होल्ट विद्युत उप केंद्राचे उप जल अभियंता प्रभाकर शिंदे, कार्यकारी अभियंता पल्लवी अटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आभियंते – कामगार यांच्या प्रयत्नाने ४ दिवसांच्या परिरक्षणाची कामगिरी ३ दिवसांत यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे आता उद्या शुक्रवार दिनांक २७ मे २०२२ रोजी वरील विभागात होणारी ५ टक्के पाणी कपात पांजरापूर येथील अभियंता व कामगार यांच्या उत्कृष्ट कामाच्या नियोजनामुळे रद्द करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community