इन्स्टाग्रामवरील मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात!

मित्राने वाढदिवसाच्या पार्टीचे निमंत्रण दिल्यामुळे पीडित मुलगी पार्टीसाठी घरातून बाहेर पडली.

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्रांनी बलात्कार केल्याची तक्रार १६ वर्षांच्या मुलीने केली असून मालवणी पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे १८ ते २२ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत गेली आणि…!

मालाड मालवणी परिसरात राहणारी १६ वर्षांची पीडिता हरवल्याची तक्रार वडिलांनी मालवणी पोलिस ठाण्यात दिली होती. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी घरी आल्यानंतर घरच्यांनी कुठे गेली होती, याबाबत चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. सदर पीडित मुलगी हिचे इन्स्टाग्रामवर काही तरुणाशी ओळख झाली होती व त्यापैकी एकाने वाढदिवसाच्या पार्टीचे निमंत्रण दिल्यामुळे ही पीडित मुलगी पार्टीसाठी घरातून बाहेर पडली होती.

(हेही वाचा : धक्कादायक! शुटींगच्या सेटवरच बाल कलाकारावर बलात्कार!)

मित्रांनी घेतला गैरफायदा!

दरम्यान पार्टीत दोघांनी प्रथम तिच्यावर लैंगिग अत्याचार केला, त्यानंतर पीडिता तिसऱ्या मित्रासोबत गेली असता त्याने देखील तिच्यावर अत्याचार केला. रात्र उशीर झाल्यामुळे घाबरलेली पीडिता एका मित्राच्या घरी गेली त्याने देखील तिचा फायदा घेत अत्याचार केल्याची तक्रार तिने पोलिसना दिली. पोलिसांनी बलात्कार, पोक्सोचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी चारही आरोपींना अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here