1 जुलैपासून देशभरात अनेक बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे तर दुसरीकडे, आधार-पॅन लिंक करण्यासाठी 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. नेमक्या कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत ते पाहूया…
नेमका कोणता गॅस सिलिंडर स्वस्त
व्यावसायिक गॅस सिलिंडच्या दरात शुक्रवारी कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2 हजार 219 रुपयांवरुन 2 हजार 21 रुपयांवर आली आहे. तर मुंबईत 217. 50 रुपयांवरुन 1 हजार 981 रुपयांवर किमती आल्या आहेत.
क्रिप्टोकरन्सीवर किती टीडीएस?
क्रिप्टोकरन्सीसाठी केलेले व्यवहार एका वर्षात 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यावर 1 टक्के शुल्क आकारले जाईल. प्राप्तिकर विभागाने आभासी डिजिटल मालमत्तेसाठी टीडीएस डिस्क्लोजर मानदंड जाहीर केले आहेत. सर्व एनएफटी किंवा डिजिटल चलन त्याच्या कक्षात येतील.
आधार- पॅन लिंक करण्यासाठी किती दंड
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत. 30 जूनपर्यंत हे काम 500 रुपयांत व्हायचे. आता तुम्हाला 500 रुपये जास्त द्यावे लागतील.
( हेही वाचा: रेडिमेड कपडे स्वस्त होणार? )
KYC नसलेल्या D-MAT खात्यांचे काय
डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख 30 जून 2022 होती. न केल्यास तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करु शकणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तरी हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत.
बाईक घेणे किती महागले
दुचाकी वाहने घेणेही महागणार आहे. हिरो मोटोकाॅर्पने आपल्या ब्रॅंडच्या किमती 3 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हिरो मोटोकाॅर्पने वाढती महागाई आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे किंमती वाढवल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
Join Our WhatsApp Community