बुधवार, २८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त लसीकरणावर चर्चा झाली, त्यानुसार लसीकरणाच्या निर्णायक टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे मोफत लसीकरण करणार आहे. त्यासाठी 2 कोटी डोस राज्य सरकार विकत घेणार आहे. यासाठी 6 हजार 500 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च होणार आहे. लसीकरण पुढील 6 महिन्यांत पूर्ण करणार आहे. 13 हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत, दर महिन्याला दोन कोटी लसीकरण करावे लागणार आहे, 5 कोटी 71 लाख नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. मात्र 1 मे रोजी लसीकरण सुरू होणार नाही, आपल्याला सबुरीने घ्यावे लागेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
नोंदणी बंधनकारक!
या टप्प्याच्या लसीकरणात सहभाग घेणाऱ्यांना कोविन अँप वापरणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कोणीही उठून केंद्रावर जाऊ शकत नाही, त्यांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. 1 मे रोजी लस उपलब्ध नसल्याने या दिवसापासून लसीकरण सुरू करत नाही, त्यासाठी आम्ही आरोग्य विभाग आणि प्लॅनिंग कमिटी सूक्ष्म नियोजन करणार आहे. 18 ते 44 साठी जे सेंटर केले जातील, ते वेगळे केले जातील, सेंटर कोविड पसरवणारे सेंटर होऊ नये याची काळजी घ्यावी, असेही आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले.
‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीवर शिक्कामोर्तब, लॉकडाऊन वाढणार!
लसीची उत्पादन क्षमता वाढत आहे. फक्त घाईगडबड करू नये, आपल्याला लॉकडाऊन वाढवावे लागेल, किती दिवसाने वाढवायचे यावर शेवटच्या दिवशी अर्थात ३० एप्रिल रोजी निर्णय होईल, साधारण पुढील लॉकडाऊन 15 दिवसांचा असेल, असेही राजेश टोपे म्हणाले. यामुळे ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
(हेही वाचा : राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार?)
Join Our WhatsApp Community