सध्या देशभर दीपावलीचा उत्साह आहे. बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. घराघरात गोडधोड बनू लागले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खरेदी-विक्रीला जोर आला आहे. थोडक्यात काय तर सगळे काही चांगले-चांगले दिसत आहे. पण खिशाचे काय? म्हणतात ना, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. हेच खरे आहे. बाजारात झगमगाट दिसत असला तरी सर्वसामान्यांना परवडेल अशी परिस्थिती बाजारात नाही. त्यातही गॅस, इंधन दरवाढीने महागाईचा आलेख वरती वरती सरकत चालला आहे, त्यामुळे ही दिवाळी दिवाळ काढणार, अशी परिस्थिती आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे बदल हे सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे ठरणार आहेत.
गॅस दरवाढ
नव्या नियमानुसार पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला सिलिंडरचे नवे दर ठरवतात. मागील महिन्यांचा अनुभव पाहता हा दर कमी झालेला नाही. त्यामुळे या महिन्यात स्वयंपाकाचा सिलिंडर किती रुपयांनी वाढणार आहे, हे पहावे लागणार आहे आणि त्याची तयारीही सामान्यांना करून ठेवावी लागणार आहे.
(हेही वाचा : धक्कादायक! दररोज ३१ मुले संपवतात जीवनयात्रा!)
सिलिंडरसाठी ‘ओटीपी’
१ नोव्हेंबरपासून सिलिंडर बुकिंगच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. सिलिंडर बुकिंग केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार आहे. तो ओटीपी सांगितल्याशिवाय तुम्हाला तुमचा सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक योग्य तोच नोंदवून घ्या.
रेल्वे वेळापत्रकात बदल
तुम्ही दिवाळीच्या सुटीत लांबच्या प्रवासाचा बेत आखत असाल, तर हा बदल तुमच्यासाठी महत्वाचा आहे. भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबरपासून १३ हजार लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. खरे तर हा बदल १ ऑक्टोबरपासून होणार होता, मात्र आता तो १ नोव्हेंबरपासून झाला आहे. यामध्ये ७ हजार मालगाड्या आणि ३० राजधानी एक्सप्रेसचाही समावेश आहे.
बँकेचे व्यवहार महागले
बँक ऑफ बडोदा या बँकेने १ नोव्हेंबरपासून बँक व्यवहारातील शुल्कात बदल केला आहे. १ नोव्हेंबरपासून बँकेने महिन्यातून ३ वेळाच ग्राहकांना पैसे काढणे आणि भरणे शक्य होणार आहे. त्यापेक्षा अधिक वेळा ही प्रक्रिया केली तर प्रत्येक व्यवहारासाठी खातेदारांना ४० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र जनधन खातेदारांना यातून सूट देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप बंद होणार!
आयफोन आणि काही अँड्रॉईड मोबाईल फ़ोनवे व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. फेसबुकच्या मालकीचे अँड्रॉईड ४.०.३, आयसीएस, आयओएस ९ आणि केएआयओएस २.५.० ला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.
Join Our WhatsApp Community