१ ऑक्टोबरपासून राजभवन सर्वसामान्यांसाठी खुले

तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर येत्या १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा करण्यात येणार आहे. त्यासाठी १० सप्टेंबरपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

( हेही वाचा : ना दहिहंडीच्या शुभेच्छा, ना गणेशोत्सवाच्या; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!)

राजभवन भेटीची वेळ सकाळी ६ ते सकाळी ८.३० अशी असेल. दरदिवशी निवडक ३० लोकांना भेट देता येईल. ‘राजभवन हेरिटेज टूर’मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक पाहता येईल.

मंगळवार ते रविवार

सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल. दिवाळीमुळे २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही, असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here