बॅंकेशी संबंधित व्यवहारासंबंधी 26 मेपासून एक मोठा नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम अर्थात बॅंकतील व्यवहारासंबंधी आहे. एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांहून अधिकच्या रोखीचा व्यवहार करत असाल, तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहिती देणे अनिवार्य आहे. या नियमाचे जर पालन केले गेले नाही, तर प्राप्तीकर खात्याची नोटीस येण्याची शक्यता आहे. रोखीतील व्यवहारात 20 लाख रुपये खात्यातून काढत असाल, तर आधार कार्ड अथवा पॅन कार्ड क्रमांकाची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
असा आहे नियम
बचत खात्याऐवजी जर एखाद्या व्यक्तीकडे चालू खाते अथवा रोख क्रेडिट खाते असो, या खात्यांनाही 20 लाख रोखीचा नियम लागू असणार आहे. नवीन खाते उघडणारे सुद्धा या नियमांपासून सुटलेले नाहीत. बॅंक राष्ट्रीय असो, सहकारी असो, खासगी असो वा टपाल खात्यातील बचत खाते असो, हा नियम सगळीकडे लागू करण्यात आला आहे. या सर्व खात्यांमध्ये एकत्रित एका वर्षात 20 लाख अथवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार झाला, तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅनकार्डची नोंद करणे अनिवार्य आहे.
( हेही वाचा :38 वर्षांपूर्वी त्या तुफान रात्रीने घेतले होते 11 हजार लोकांचे जीव )
Join Our WhatsApp Community