चिपीवरुन काहीच दिवसांत उडणार विमान! किती आहे तिकीट?

चिपी विमानतळ येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून, पहिलं विमान हे मुंबई ते सिंधुदुर्ग असे झेपावणार आहे.

101

चिपी विमानतळ… कोकणातील या विमानतळाच्या उद्घाटनावरुन गेले अनेक महिने चीपीच्या धावपट्टीवरुन राजकीय टीकास्त्रांची मिसाईल जोरदार उडत होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा या विमानतळाच्या उद्घाटनावरुन ठाकरे सरकारवर टीका केली होती. अनेकदा उद्घाटनाच्या चर्चा हवेत उडत होत्या, पण चिपीवरुन विमान काही उडालं नाही. अखेर अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या चिपी विमानतळाला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ टेक ऑफसाठी सज्ज झालं आहे. चिपी विमानतळ येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून, पहिलं विमान हे मुंबई ते सिंधुदुर्ग असे झेपावणार आहे.

केंद्रीय उड्डाण मंत्र्यांचे ट्वीट

UDAN योजनेंतर्गत 9 ऑक्टोबरपासून मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यान प्रतिदिन विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांनी दिले आहे. तसेच या हवाई मार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग मधील अंतर केवळ 1 तास 25 मिनिटांत कापले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक भारतीयापर्यंत विमान सेवा पोहोचवण्याचा भारत सरकारचा संकल्प

विनायक राऊत यांची माहिती

आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्याचंही शिवसेनेचे सिंधुदुर्ग येथील खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. तब्बल 800 कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. चिपी विमानतळाला डीजीसीएनं हा परवाना दिला आहे. या विमानतळावरुन प्रवासी तसेच कार्गो विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग कंपनीने बांधलेलं हे पहिलं ग्रीन फिल्ड विमानतळ आहे.

(हेही वाचाः केईएम रुग्णालयात स्मृतिभ्रंशच्या आजाराकरता मेमरी क्लिनिक)

इतक्या रुपयांत होणार प्रवास

मुंबईतील चाकरमान्यांना गणपती किंवा शिमग्याच्या सणांना गावी जाताना तिकीटं मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. ब-याचदा सणांच्या वेळी लक्झरींच्या तिकीटांच्या किंमतीतही वाढ केली जाते. पण, आता मात्र 2500 रुपयांत चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात विमान प्रवास करता येणार आहे. रस्ते किंवा रेल्वे मार्गाने प्रवासात बराच वेळ खर्च करावा लागतो. परंतु विमानाने हाच प्रवास अत्यल्प वेळात आणि सुकर होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.