1 ऑगस्टपासून रोख व्यवहारांशी संबंधित बदलणार ‘हे’ नियम

1 ऑगस्टपासून रोख व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. नेमके कोणते नियम बदलणार आणि तुमच्यावर त्याचा थेट काय परिणाम होणार हे जाणून घेऊ.

का बदलला हा नियम?

फसवणुकीला आळा घालण्यासाठी 2020 मध्ये चेक पाॅझिटिव्ह पेमेंट सिस्टमची सुरुवात करण्यात आली होती. याच्याद्वारे 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या चेकसाठी काही महत्त्वाची माहिती द्यावी लागते.

चेकचे नियम

  • बॅंक ऑफ बडोदाचे चेक पेमेंटचे नियम 1 ऑगस्टपासून बदलणार आहेत. 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पाॅझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्यात आली आहे.
  • या अंतर्गत चेक जारी करणा-याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बॅंकिंग किंवा मोबाईल अॅपद्वारे बॅंकेला द्यावी लागेल.
  • त्यानंतर चेक क्लिअर होईल. जर कोणताही चेक जारी करायचा असेल, तर त्याचा क्रमांक, देयकाची रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यासह अनेक तपशील बॅंकेला प्रदान करावे लागतील.

बॅंका 18 दिवस बंद

ऑगस्ट महिन्यात एकूण 18 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. RBI ने ऑगस्टमध्ये आपल्या यादीत अनेक दिवस बॅंक बंद असल्याची माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत. ज्या दिवशी बॅंकांचे कामकाज चालणार नाही.

गॅस सिलिंडर स्वस्त की महाग ?

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किमती निश्चित होत असतात. 1 ऑगस्ट रोजी सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरचा दर निश्चित करतील. गेल्या वेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. त्यामुळे देशभरात गॅसच्या किमती 1050 च्या पुढे गेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here