गॅस, इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने हैराण झालेल्या सामान्य ग्राहकाला आता गायीच्या दूधासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिलिटर ४ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला. वेगवेगळे दूध संघ व डेअरी हे गायीचे दूध ५० रुपयांना विकत आहेत. ते सरसकट ५४ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा – DAE Recruitment: अवघ्या १८व्या वर्षी मिळवा ‘या’ विभागात केंद्र सरकारच्या नोकरीची संधी)
पुणे येथील कात्रज डेअरीमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकच्या धरतीवर राज्यातील दूध उत्पादकाला राज्य सरकारने पाच रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. व्यवसायातील नफा कमी होत असल्यामुळे राज्यातील दूध व्यवसायिकांमध्ये अस्वस्थता आहे. याचे पडसाद राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांचा समावेश असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत उमटले.
(हेही वाचा – … तर LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही! काय आहे कारण?)
राज्यातील सर्वच दूध व्यावसायिक संस्थांनी पिशवी बंद गायीच्या दुधाचा दर कमाल ५४ रुपये ठेवावा असा निर्णय घेण्यात आला. तसेच वितरकाला ५ रुपये कमिशन देण्यात येणार आहे. काही संस्था निकृष्ट दर्जाचे दूध कमी दराने विकत असून यासाठी तब्बल १२ रुपये कमिशन वितरकाला दिले जाते, असेही सांगण्यात आले. दूध व्यापारी संघाकडून ही दरवाढ १ नाेव्हेंबर २०२२ पासून करण्यात येणार आहे. दूध विक्री दरात प्रति लिटर दाेन रुपये वाढ करण्यात येणार असल्याचे साेलापूर दूध व्यापारी संघाने जाहीर केले. दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आल्यामुळे दूध व्यापारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. दूध खरेदी बाजारपेठेत वारंवार वाढ हाेत असल्याने त्या अनुषंगाने विक्री दरात वाढ केल्याचे कळवले.
Join Our WhatsApp Community