दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा (Board Exam) दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. त्यानंतर बोर्डाच्या परीक्षांबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांनी सांगितले की, आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, अभ्यासक्रामाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधीदेखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे.
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : हमासच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने वाटलेल्या मिठाईचा हिशोब चुकता; इस्रायल
Appearing for class 10, 12 board exams twice a year will not be mandatory: Union Education Minister Dharmendra Pradhan to PTI
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2023
एकच संधी असल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करणे, हा यामागील उद्देश असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पुढे म्हणाले की, परदेशी विद्यापीठांसाठी भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जात आहे. याबद्दल लवकरच अधिसूचित केले जाईल. आमचे बदल आदर्श स्वरुपाचे असणार आहेत. याबाबत अनेक देशांशी आमची चर्चाही सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय त्यांच्याशी समन्वय साधत आहे.
यावेळी कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांवर बोलताना प्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचा जीव जायला नको.
Join Our WhatsApp Community