FSSAI Mangoes Alert : जास्त आंबे खाताय तर थांबा… FSSAIने दिला इशारा

368
FSSAI Mangoes Alert : जास्त आंबे खाताय तर थांबा... FSSAIने दिला इशारा
FSSAI Mangoes Alert : जास्त आंबे खाताय तर थांबा... FSSAIने दिला इशारा

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा (Mango) हे उन्हाळ्यातील आपल्या सर्वांचे आवडते फळ (FSSAI Mangoes Alert ) आहे. क्वचितच लोक असे असतील ज्यांना आंबा खाणे आवडत नाही. चवीला उत्तम असणाऱ्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि फायबर (Fiber) भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय प्रथिने (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), फॅट्स (Fats) आणि पोटॅशियम (Potassium) देखील असते. आंब्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated fats) आणि सोडियमचे (Sodium) प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते एक सुपरफ्रुट (Mango Is Known As Superfruit) म्हणून ओळखले जाते. (FSSAI Mangoes Alert )

सीझन सुरू झाला की, आपण आंब्यावर ताव मारतो. पण, तुम्ही जर असं करत असाल तर थांबा. अलिकडेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यावसायिक (FBOs) तसेच फळे पिकवणाऱ्या केंद्रांच्या चालकांना फळे कृत्रिमरित्या पिकवण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शिअम कार्बाइडच्या पावडरच्या (Calcium Carbide) वापराबाबतही इशारा जारी केला आहे. (FSSAI Mangoes Alert )

FSSAIच्या मते, वर्ष 2011पासून आंबा पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड पावडरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पण अनेक फळ व्यापारी आजही आंबा पिकवण्यासाठी आरोग्यास हानिकारक असलेले हे रसायन वापरत आहेत. ज्यामुळे लोकांच्या आरोग्यास गंभीर स्वरुपात अपाय होऊ शकतात. आंब्यासह काही अन्य फळेही कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकवली जातात. याामुळे वातावरणात अ‍ॅसिटिलीन गॅस उत्सर्जित होते. तसेच यामध्ये आरोग्यास हानिकारक असणारे तत्त्व आर्सेनिक आणि फॉस्फरसचाही समावेश असतो. यामुळे चक्कर येणे, चिडचिड होणे, वारंवार तहान लागणे, अशक्तपणा जाणवणे, खाद्यपदार्थ गिळताना त्रास होणे, उलट्यांचा त्रास, त्वचेवर पुरळ येणे यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (FSSAI Mangoes Alert )

कार्बाइडयुक्त आंबा कसा ओळखावा?

  • तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांच्या तुलनेत कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकवलेल्या आंब्यांवर काळे डाग जास्त प्रमाणात असतात आणि फळाचा सुगंध अधिक गडद स्वरुपात असतो.
  • जर आंब्याचा रंग गडद पिवळा असेल तर असे आंबे खरेदी करणे टाळा.
  • खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच आंबे खराब होत असतील, तर फळ पिकवण्यासाठी रसायनाचा वापर केल्याचा हा संकेत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.