G-20 Summit : जी-20 शिखर परिषदेला दिल्लीत सुरुवात, पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रप्रमुखांचे केले स्वागत

आफ्रिकन युनियन स्थायी सदस्य

170
G-20 Summit : जी-20 शिखर परिषदेला दिल्लीत सुरुवात, पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रप्रमुखांचे केले स्वागत
G-20 Summit : जी-20 शिखर परिषदेला दिल्लीत सुरुवात, पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रप्रमुखांचे केले स्वागत
  • वंदना बर्वे

नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम’ येथे जी-20 शिखर परिषदेला दिमाखात सुरवात झाली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले.

जगातील विकसीत आणि विकसीनशील देशांचा गट जी-20 च्या शिखर परिषदेला सुरवात झाली आहे. मोरोक्कोमध्ये आलेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना आधी श्रध्दांजली वाहण्यात आली. मोरक्को सरकारला गरज पडेल ती मदत करण्याची भारताची तयारी असल्याचेही पंतप्रधानांन यावेळी स्पष्ट केले.त्यानंतर परिषदेच्या कामकाजाला सुरवात झाली.

10 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या समिटसाठी दिल्ली पूर्णपणे तयार आहे. दिल्लीला वधूप्रमाणे सजवण्यात आले असून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (8 सप्टेंबर) विविध देशांच्या लोकप्रतिनिधींसोबत द्विपक्षीय बैठकही घेतली होती. पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्याशी द्विपक्षीय चर्चेत भाग घेतला.

(हेही वाचा – Bhopal Gas Tragedy : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात असताना अमेरिकेत उपस्थित झाला भोपाळ गॅस दुर्घटनेचा मुद्दा )

पंतप्रधानांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि विविध देशांच्या प्रमुखांचे परिषदेत स्वागत केले. यानंतर आफ्रिकन युनियन जी—20 गटाचा स्थायी सदस्य झाला असल्याचे जाहीर करीत मोदी यांनी आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांना आपल्या जागेवर बसण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांना जागेपर्यंत घेवून गेले.

सर्व देशांच्या नेत्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की 21 व्या शतकातील हा काळ एक महत्त्वाचा काळ आहे जो संपूर्ण जगाला एक नवीन दिशा दाखवेल आणि देईल. ते म्हणाले की हीच वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेत, म्हणून आपल्याला मानवकेंद्रित दृष्टीकोन स्वीकारून एकत्रितपणे पुढे जावे लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.