देशाची राजधानी नवी दिल्ली येथी भारत मंडपम येथे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी शिखर परिषद पार पडणार आहे. ही बैठक जागतिक विकासासाठी महत्त्वाची ठरेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
या परिषदेबाबत ते म्हणाले की, जी-20 शिखर परिषद मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवीन मार्ग तयार करेल. ‘वसुधैव कुटुंबकम’ (एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य) असे भारताचे धोरण आहे. भारताचे जी-20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे. आम्ही ग्लोबल साऊथच्या विकासात्मक चिंतांना सक्रीयपणे आवाज दिला आहे. त्यामुळे आता मानवकेंद्रित विकासाचे पर्व सुरू होणार आहे.
(हेही वाचा – Rain Update : राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस, येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा )
जगातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व जी-20 देश एकत्रित काम करतील,असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण आणि जागतिक शांतता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘वन अर्थ’, ‘वन फॅमिली’,’वन फ्युचर’ या सत्रांमध्ये शाश्वत भविष्यासाठी हरित विकास कराराच्या प्रगतीला गती देण्याचा आणि एकविसाव्या शतकासाठी बहुपक्षीय संस्थांना बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community