सध्या भारतात सुरू असलेल्या जी-२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी सोमवारी रात्री मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवणारा लाईट अँड साऊंड शो देखील आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राची संस्कृती पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले होते. जी-२० च्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारी झाली. त्यानंतर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जी-२० परिषदेनिमित्त आलेल्या विविध देशांतील प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दही हंडी, ढोल-ताशा आणि लावणी आदींचा समावेश होता. या निमित्ताने जी-२० प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेता यावा, यासाठी विशेष लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडियाच्या भिंतींवर प्रोजेक्ट करून शिवरायांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. यावेळी विदेशी पाहुण्यांना ढोल-ताशाची भुरळ पडली. त्यांनी पारंपारिक मराठी नृत्यामध्ये सहभागी होत ढोल आणि ताशा वाजवून पाहिला.
(हेही वाचा – Biggest Cake : पुण्याच्या केक-आर्टिस्टने केला जागतिक विक्रम; तयार केला २०० किलो महाल-केक)
जी-२० परिषदेतील पाहुण्यांनी घेतला ‘शिकारा’चा अविस्मरणीय अनुभव
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे सोमवारी मोठ्या बंदोबस्तामध्ये जी-२० शिखर संमेलनाला सुरुवात झाली. यामध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल २५ देशांचे ६० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यातील काही प्रतिनिधींनी श्रीनगरच्या दल सरोवरामध्ये शिकारा सवारीचा आनंद घेतला. २०१९ मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. या शिकारा सवारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही मनमोहक दृष्य श्रीनगरच्या दल सरोवरातील आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community