G7 Summit: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींनी मोदींना केलेलं ‘नमस्ते’ चर्चेत, सोशल मीडियावर ‘या’ व्हिडिओचं नेटकऱ्यांकडून स्वागत

161
G7 Summit: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींनी मोदींना केलेलं 'नमस्ते' चर्चेत, सोशल मीडियावर 'या' व्हिडिओचं नेटकऱ्यांकडून स्वागत

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी G7 परिषदेसाठी जगभरातून आलेल्या नेत्यांचं स्वागत ‘नमस्ते’ म्हणून केलं. विशेष बाब म्हणजे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांचं स्वागतही त्यांनी नमस्ते, असे म्हणूनच केलं. मोदींनीही त्यांना नमस्कार केला. या दोघांच्या ‘नमस्ते’चा फोटो सोशल मीडियावर मोठा प्रमाणात व्हायरल होतो आहे तसंच नेटकऱ्यांनी या दोन्ही नेत्यांचं, खासकरून जॉर्जिया मेलोनींचं स्वागत केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेसाठी इटलीत पोहोचल्यानंतर त्यांनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. त्यावेळी हस्तांदोलन करण्याऐवजी मेलोनी यांनी नमस्ते करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच इतर नेत्यांनाही त्यांनी नमस्ते केलं. ज्याचं कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आहे. हस्तांदोलन करणं ही पाश्चात्त्य पद्धत आहे. तर नमस्कार, नमस्ते अशा पद्धतीने स्वागत करणं ही भारतीय पद्धत आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी अशा भारतीय पद्धतीने स्वागत केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

(हेही वाचा – BMC Corruption : महापालिकेत अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचार होतोय, भाजपाने केले मान्य )

नेटकरी नेमकं काय काय म्हणत आहेत?
इटलीत भारताची संस्कृती दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवली आहे. असं कुमार नावाच्या एका युझरने म्हटलंय. देख रहा है ना बिनोद मोदीजी को नमस्ते किया. अशी एक कमेंट मुकुल नावाच्या युझरने केली आहे. जगभरात नमस्ते चर्चेत आलंय ते फक्त मोदींमुळेच, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ आणि फोटो अनेक नेटकरी व्हायरल करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.