गडचिरोली मधील (Gadchiroli Accident) सुरजागड लोह प्रकल्पाचे काम सुरु असतांना एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एका अभियंत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पात रविवार, ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी एक अपघात झाला. प्रकल्पाच्या ठिकाणी नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर जोरदार कोसळला. त्यामुळे या महिंद्रा कॅम्परमधील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा अधिक तपास सुरु केला आहे.
मृतकांमध्ये (Gadchiroli Accident) सोनल रामगीरवार (वय 26, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरियाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.
(हेही वाचा – Muslim : युरोप जळतोय, भारताचे काय?)
सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून (Gadchiroli Accident) लोह उत्खनन सुरु आहे. या पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळलं. हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर कोसळलं. त्यामध्ये इंजिनिअर सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं.
या अपघातानंतर (Gadchiroli Accident) परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community