गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन (Gadchiroli) गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज 1 ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस दल, तसेच रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्ट व माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील गरजू नागरिकांसाठी विविध ‘साहित्य वाटप कार्यक्रम’ पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला. (Gadchiroli)
यावेळी दुर्गम-अतिदुर्गम भागातील 200 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहीत बचत गटातील महिला आणि नागरिक उपस्थित होते. यामध्ये 75 विद्यार्थी-विद्यार्थींनींना सायकल, 75 नागरिकांना स्मोकलेस चूल, तसेच पुरुष व महिला बचत गटांना स्प्रे-पंप व खताच्या बॅगेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनी व नागरिकांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील जनतेने आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन आपली उन्नती साधावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. यासोबतच महिलांना आता स्मोकलेस चूल्याच्या वापराने धुरामुळे होणारा त्रास कमी होईल. तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा व गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. (Gadchiroli)
In naxal affected remote areas of Gadchiroli, 75 cycles were distributed to school going children by @SPGadchiroli on occasion of Gandhi Jayanti. This was sponsored by Avighna group, Mumbai, Rotary club South East, Nagpur & executed by Maulimitra Seva mandal, Nagpur. pic.twitter.com/Od6X0TzHQl
— Praveen Dixit, IPS (@PNDixitIPS) October 3, 2023
तसेच कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनींनी व बचत गटातील पुरुष व महिलांनी व इतर नागरिकांनी सायकल तसेच इतर विविध साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच रोटरी क्लब, साऊथ ईस्ट नागपूरचे अध्यक्ष राजीव वरभे, माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूरचे अध्यक्ष सुहास खरे व रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्टच्या फर्स्ट लेडी स्मिता वरभे मॅडम हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. (Gadchiroli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community