Gadchiroli Naxalism: सी-६० कामांडोंचं अतुलनीय कार्य; उत्तर गडचिरोली ३५ वर्षांनंतर नक्षलवाद मुक्त 

183
Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये पोलिसांना मोठे यश; नारायणपूर चकमकीत ३० नक्षलवादी ठार
Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये पोलिसांना मोठे यश; नारायणपूर चकमकीत ३० नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेजवळील वांडोलीच्या जंगलात बुधवारी झालेल्या चकमकीत कोरची टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलमचे तब्बल तीन विभागीय समिती सदस्य, दोन उपकमांडर, तीन एरिया कमिटी मेंबर आणि चार दलम सदस्य ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सात पुरुष आणि पाच महिला अशा १२ जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम संपवण्यात यश आल्याचा दावा गडचिरोली पोलिस दलाने केला आहे. (Gadchiroli Naxalism)

नक्षल सप्ताहादरम्यान हिंसक कारवाया करण्यासाठी कोरची-टिपागड आणि चातगाव- कसनसूर दलमचे सुमारे १५ माओवादी छत्तीसगड सीमेजवळील वांडोलीच्या जंगलात तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात विशेष अभियानचे सात पथक तातडीने शोधमोहिमेवर निघाले. हे पथक अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार सुरू केल्याने चकमक उडाली. 

(हेही वाचा – Wagh Nakh: प्रतीक्षा संपली… शिवकालीन वाघनखं साताऱ्याच्या वस्तु संग्रहालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा)

पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी जंगलाचा आसरा घेऊन पसार झाले. चकमकीनंतर जंगल परिसरात शोध अभियान राबविण्यात आले असता घटनास्थळावरून १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळले. यासोबतच ११ बंदूक, तीन एके-४७, दोन इन्सास रायफल, एक कार्बाइन रायफल, एक एसएलआर रायफल, स्वयंचलित हत्यार, स्फोटके, डेटोनेटर, बीजीएल व मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. चकमकीदरम्यान गडचिरोली पोलिस दलाचे पीएसआय सतीश पाटील व शंकर पोटावी, विवेक शिंगोळे हे दोन पोलिस हवालदार जखमी झाले आहेत. (Gadchiroli Naxalism)

नऊ माओवाद्यांवर ३०१ गुन्हे

चकमकीत ठार माओवाद्यांची ओळख पटली असून हे गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगडच्या बस्तरमधील मूळ रहिवासी होते. १२ पैकी नऊ माओवाद्यांवरील गुन्ह्यांची माहिती उघड झाली असून, यांच्यावर सुमारे ३०१ गुन्हे दाखल आहेत.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.